मी मनोगती आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझं माझ्या मायबोलीवर प्रेम आहे. त्यामुळे मी जे केलं ते सहज आहे, त्यात विशेष असं काही नाही.

श्री साधूंनी मला सविस्तर लिहायला सांगीतलं ते याचसाठी की मराठीसाठी नव्या तंत्रज्ञानात काय घडतं ते सगळं त्यांना कळायला हवं. मी संगणक आणि आंतरजालाचा विषय काढताच ते लगोलग म्हणाले की मी संगणक वापरतो. माझी आताची जी नवी पुस्तके आहेत ती संगणकावरच आहेत. मी आंतरजालावर मराठी वापरण्याचा प्रयत्न केला पण ते खुप कठीण वाटतं ( मला वाटतं त्यांना फॉन्ट स्थापीत करण्याविषयी बोलायचे असेल.)

मी त्यांना सविस्तर लिहीन, त्यात मराठीचे युनिकोड प्रमाण आणि त्याचा वापर , मराठीतील नव्या आणि भरपुर ताकदीच्या संकेतस्थळांविषयी. आदी माहिती लिहीण्याचा विचार आहे. काही सुचना असल्यास स्वागत आहे.

नीलकांत