हे दोघे गौतम ऋषी एक नसावेत असे वाटते.

रामायणात इंद्राला शाप देणाऱ्या गौतम ऋषींचा आश्रम मिथिला नगरीजवळ होता. त्यांचे पुत्र ऋषी वामदेव हे जनक राजाचे (आणि दशरथाचेही?) सल्लागार होते. यावरून हा आश्रम उत्तर भारतात असल्याचे दिसते.

तर,

गोदावरी नदी काठच्या गौतम मुनींचा आश्रम मंथनी या आंध्रप्रदेशातील ठीकाणी होता असे वाचनात आले. मंथनीचे नाव इतिहासात 'मंत्रकूट' असे नमूद करण्यात येते. याचे कारण या आश्रमात गौतम ऋषी व त्यांच्या पुत्रांनी अनेक मंत्र प्रसवले ज्यांचा समावेश पुढे ऋग्वेदात करण्यात आला.

आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा या गौतम ऋषींच्या  संदर्भात आढळते.

बऱ्याच ठीकाणी या दोन्ही गौतम ऋषींना एकच म्हणून दाखवले गेल्याचे पाहण्यात आले, आणि  तरीही या दोन आश्रमांच्या निरनिराळ्या स्थानांवरून हे दोन ऋषी वेगळे असावेत असे वाटून गेले.

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!