असेच स्थानांच्या फरकामुळे मलाही वाटले. फक्त इंद्राला श्याप दिल्याच्या पश्चात ते दक्षीणेत आले किंवा काय ही माहिती मिळण्याबद्दल औत्सुक्य होते
हो ही शक्यता मी ही गृहीत धरली. अहल्येला शाप देऊन गौतम ऋषी तपस्येसाठी निघून गेले असे मानले तर झाल्याप्रकाराने व्यथीत होऊन बहुधा ते एकांतवासात असावेत, अशावेळी ते नवा आश्रम स्थापन करतील की काय याबाबत मी साशंक आहे. अर्थात, या परिस्थितीत, एकांतवासात, त्यांनीच मंत्र प्रसवले असतील की काय ही शंका ही येऊन गेली. (हे कल्पनाविलास अतीच होत असल्यास चू. भू. द्या. घ्या)
यापुढील संदर्भ पाहायचा झाल्यास रामाने अहल्येचा उद्धार केल्यावर त्याचवेळी गौतम ऋषी अहल्येचा स्वीकार करण्यास आश्रमात प्रकट झाले असे वाचनात येते. यावरून ते दक्षिणेत नसून आसपासच्या भागातच भ्रमंती करत असावेत असे वाटले.
यासर्व पौराणिक कथांचे संदर्भ तपासणे इतके कठिण होते आणि अधिकच गोंधळ उडतो.
त्यात गोदावरी नदी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय.
कल्पना आहे. :) या लेखाच्या सर्व निर्मात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.