प्रदीप ,
धन्यवाद.
तुमच्या मार्मिक लिखाणातून सुचलेल्या काही गोष्टी.
जी. एंच्या कथांत वरवरच्या जखमांचे कौतूक नाही. 'लाल, उष्ण मांस दिसले पाहिजे' !
जयवंत दळवींनी या गोष्टीचा त्यांच्या जी एंवरील लेखात उल्लेख केला होता; आणि विशेष म्हणजे ही एक विकृति असल्याचा त्यांनी निर्देश केला आहे. मला वाटते दळवींची ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे. एकीकडे जी ए स्वतःच स्टाईनबेकचा हवाला देऊन आपण "वेदनेच्या नसेच्या जास्तजास्त जवळ जाण्याच्या प्रयत्नांत आहोत" असे म्हणतात. "जी ए पचत नाहीत, ते अत्यंत morbid आहेत" अशी एकूण प्रतिमा आणि 'लाल, उष्ण मांस दिसले पाहिजे' हा जी एंचा आग्रह ही, मला वाटते जी एंच्या संदर्भांतील अनेक dichotomies पैकी एक.