यासर्व पौराणिक कथांचे संदर्भ तपासणे इतके कठिण होते आणि अधिकच गोंधळ उडतो
-सहमत.
गोदाकाठच्या गौतमऋषींनी गोदावरी उगम पावण्या करिता भगिरथ प्रयत्न केले असावेत असे लेखाकरिता माहिती घेताना वाटले होते . गोदावरीच्या उगमाची आख्यायिका वाचताना शंकराच्या आशीर्वादाची कथा येते त्यामुळे कदाचित ऋषींच्या स्वतःच्या मेहनती कडे नकळत दुर्लक्ष होते का काय असे वाटून जाते कारण शंकराचा आशीर्वाद मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना गोदावरीच्या प्राप्ति करिता वणवण करावी लागली असावी. आणि त्यांची गोदावरी शोधाची प्रेरणा कदाचित तत्कालीन दुष्काळी परिस्थिती राहिली असावे असे वाटले होते.
हो गोदावरी लेख चांगला बनतो आहे. ज्यासर्वांनी त्या लेखास हातभार लावला त्यांचे मी सुद्धा अभिनंदन करतो. आपले धन्यवाद.
-विकिकर