"हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्ाय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. "
या उताऱ्यातील विचारांशी सहमत.वैयक्तिक पातळीवर काही प्रयत्न होतात.पण समाज म्हणून जी भूमीका मराठी माणूस घेत आला आहे हा ती चिंतेचाच विषय आहे. ज्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले त्यांचा मराठी माणूस 'कळस' वगैरे म्हणून गौरव करताना दिसतो,पण स्वतः कळस चढण्याची वेळ आणि संधी येते तेव्हा मात्र डोंगरपाय्थ्याशीच प्रदक्षीणा घालून चालता होतो (का पाठ दाखवतो?).कळसाच्या दिशेने जे एक जास्तीचे पाऊल पडायला हवे ते पडतच नाही.
पूर्व बंगाल्यांचे सोडून द्या पण फक्त पश्चिम बंगालशी तुलना केली तर तीथे जसा पुस्तकांचा खप होतो तसा महाराष्ट्रात होत नाही.सामान्य बंगाली माणूस टागोरांचे ग्रंथ डोक्यावर घेतो तेव्हा स्वतः ते वाचतो सुद्धा आणि हौसेने भर्पूर लिहितो सुद्धा,हे मराठी माणसा बद्दल खरे आहे का?
मी ज्ञानभाषाशी संबधीत विकिपीडियाचा तुलना केली तर, मराठी विकिपीडियावर तीन वर्षात होत त्याच्या चारपट काम नऊ महीन्यात बंगाली विकिपीडिया करतो.
-विकिकर