२-३ गोष्टी...
पुरावे?? नक्की कशाचे? जगात बहुतांश संख्येने अतिरेकी एकाच धर्माचे आहेत या 'योगायोगाचे'? काहितरी उगाच..
बहुतांश अतिरेकी एकाच धर्माचे आहेत हा योगायोग कसा म्हणता येइल? तसे मी तरी म्हणणार नाही, म्हटलेलेही नाही. मुस्लिम कर्मठतेचा आणि सर्व जग मुस्लिम करून टाकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असहिष्णु धर्मांध गटांचा अतिरेकास हातभार आहेच आहे. पण हा काही संपूर्ण मुसलमान समाजाला अतिरेकी ठरविण्यासाठी पुरावा म्हणता येणार नाही. मुशर्रफपासून ते फारुक अब्दुल्लापासून ते मुलायमपर्यंत सर्वांना भारतीयांनी मुसलमानांना असे देशद्रोही ठरवावे असे वाटतेच आहे. ते तसे नाही असे मला खात्रीने वाटते. ते तसे असेल तर पुरावा द्या. नसेल तर उगाच आरोप नको.
अगदी मान्य की हे असे लिहिणे अयोग्य.. फक्त त्याला हीन, गुन्हा, हद्द इत्यादी म्हणत 'होलीयर दॅन दाऊ' असा आव आणणाऱ्यांच्यापैकी एकाच्याही मनात हे उमटत नसेलच याची खात्री नाही. तरीही समर्थन मी करत नाही.
ही एक प्रतिक्रिया आहे. अयोग्य असण्यापेक्षा दुर्दैवी आहे. ती माझ्याकडून आली असली तरी मला त्याचा खेद आहे. पण येऊ नये अशी प्रतिक्रिया मनात उमटणारे ८०% तरी हिंदू असतील याची मला खात्री आहे. उघडपणे कोणी म्हणत नाही इतकेच. दुर्दैव याचं की अशी प्रतिक्रिया निघण्याची परिस्थिती आज आहे.
अज्जुकाताईंच्या भावना समजल्या. ही प्रतिक्रिया दुर्दैवी आहे आणि तशी ती आली याबद्दल खेद आहे. यावर त्यांच्याशी व्यनिद्वारा झालेला संवाद एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी पुरेसा होता. त्यामुळे जाहीर विषय दोन्हीबाजूंनी वाढविला नाही.
आज पुन्हा आलेल्या काही अतिखाजगी प्रश्नकर्त्यांची तोंडे मात्र व्यनिद्वारा बंद न करता हा जाहीरच प्रतिसाद देण्याची वाट चोखाळली आहे.
प्रतिक्रियेबद्दल गुन्हा इत्यादी बोलणाऱ्यांनी... देशाच्या सुरक्षिततेला धोक्यात आणणाऱ्यांविषयी आणि त्यांना वाचवण्यासाठी देशाला वेठीस धरणाऱ्यांविषयी केवळ चौकशीस पात्र असे म्हणावे हेही दुर्दैवीच.. अश्यांच्यामुळे माझी दुर्दैवी प्रतिक्रिया तीव्र होण्यास मदतच होते.
भूमिकेचे थोडे स्पष्टीकरण - राजकीय अपरिहार्यता आणि न्यायाधीशांना धमकी ही कारणे मला निखालस मान्य नाहीत. त्यांच्यावर खटले भरा असेच मी म्हणतो आहे. त्यांना कायद्यानुसाअर शिक्षा घडावी असेच म्हणतो आहे. ज्याप्रमाणे सर्व मुसलमानांना देशद्रोही म्हणण्याबद्दल काही ताषेरे न झाडता पोरावा द्या नाहीतर विधान मागे घ्या असे म्हटले त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे धमकीवजा विधाने करणाऱ्यांवर खटले भरा. Bring them to justice!
न्याय करा! उशीर नको!!
यालाच समाजवादाचे विष असेही काही जण म्हणताना ऐकले होते..
हे विधान मला लागू पडत नाही... उत्तर द्यायची गरज भासत नाही.