गझल बरी आहे पण काही शेर सपाट वाटतात बुवा.

रोजचे उसनेच हे अवसान माझे
वादळाला वाटते आव्हान माझे!

पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी संबंध काय?

काळजी का वाटते माझी तुम्हांला?
चालले आहे खरोखर छान माझे!

छान चालले आहे.

खेळ चालू दे इथे निंदा-स्तुतीचा
माहिती आहे मलाही स्थान माझे...

इथे अनावश्यक पण शेर चांगला आहे.

मी कसा पडलो मला कळलेच नाही
(उंच आकाशात होते यान माझे)

छान.

जीवनाचा मुक्त मी आस्वाद घेतो
विसरुनी सन्मान वा अपमान माझे!

सपाट शेर.

नेहमी आनंद मी वाटायचो; पण-
व्यर्थ येथे जायचे का दान माझे?

आणखी काम करायला हवे होते.