पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी असे (की मुसलमानांचा भारतीय साधन संपत्तीवर प्रथम हक्क आहे) बोलायला नको होते. पण काय करणार ते कॉग्रेसच्या जीन्स मधेच आहे. शिवाय काँग्रेसमधे जायचे/राहायचे असेल तर ते आत्मसातही करायला लागते - नारायण राण्यांचे बघा आधी काय चुरूचुरू बोलायचे आणि आता काय बोलतात. छगन भूजबळ तर काँग्रेसमधे जायच्या थोडे दिवस आधी म्हणाले होते की गांधीजींचे पुतळे काढून तिथे नथूरामचे पुतळे लावले पाहीजेत. पण एकदा काँग्रेसी झाले आणि मग त्यांच्यापद्धतीने लांगूलचालन!
या चर्चेच्या संदर्भात आणि वरील काही प्रतिसादांच्या संदर्भात मला खालील मुद्दे लिहावेसे वाटत आहेतः
- हक्क आणि कर्तव्य - दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जर कोणी एकच बाजू बोलायला लागला तर अर्थातच तो खोट्या नाण्याचा वापर ठरेल.
- पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या विद्वत्त्तेबद्दल मला आदर आहे. पण असेही वाटते की त्यांचा पंतप्रधान झाल्या पासून जरा अतीच उदो उदो झाला आहे. त्यात एव्हढेच दिसून येते की भारतीय माणूस हा थोडासा व्यक्तीनिष्ठ विचार करतो. मग उदाहरणार्थ, एखाद्याला अर्थशास्त्राचे ज्ञान आहे म्हणजे तो राजकारणी झाला तरी त्यात तो बरोबरच असणार (मनमोहनसिंग) अथवा तत्त्वज्ञानी म्हणून पण हुशारच असणार (अवांतर पण अमर्त्यसेन).
- काँग्रेसला सेक्यूलर अथवा धर्मनिरपेक्ष म्हणणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. - पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होईल.