चित्तरंजन उत्तरे देतीलच, पण हा चोखंदळपणा पटला नाही म्हणून आमची उत्तरे.
- एखादा शेर स्पष्ट होत नाही म्हणजे कोणता शेर ते सांगा चोखंदळपणे. जो शेर आपल्याला स्पष्ट झाला नाही असे वाटले त्याविषयी काही अन्य मतेही असतील.
- मतल्यात एक स्वतःची अनावश्यक कसा होईल जेव्हा रदीफ
'स्वतःची 'असा आहे? हा रदीफच घेऊ नका असे म्हणता का?
- मोगरा आणि सोनचाफा ह्यात फरक आहे ; सुवासात फरक आहे. मोगरा आणि सोनचाफ्याचे वजनही वेगळे आहे.(झाडाचे वजन, फुलाचे वजन आणि मात्रांचे वजन सुद्धा)