'मठ्ठ' आणि 'गावठी' ठरण्याची भिती पत्करुनही सांगते: मॅट्रिक्स मला कळला नव्हता. म्हणजे, निओ पळून मॉर्फियसला भेटतो त्यानंतर 'बापरे, हे काय चालू आहे आणि का?' असे प्रश्न सारखे यायला लागले आणि मी स्वयंपाकघरात जाऊन छानपैकी आल्याचा चहा आणि माझ्या पद्धतीने फोडणी व कांदे घातलेले मॅगी बनवून खाल्ले आणि झोपून गेले.
पण आज हे तीन भाग वाचल्यावर मॅट्रिक्स जरा कळतो आहे असे वाटले.