मला आवडलास तू,नावातल्या लडिवाळपणासह,
म्हणून तर केले सव्यापसव्य अक्षरांना अर्थ देण्याचे
माझ्या मनातले आकाश कसे बरोबर मावले तुझ्या खिडकीत,
तुझे उसासेही जगवणारे,   तुझ्या सुखद अस्तित्वासारखे,
तुझ्या साथीने किती सहज दूरवर जाता येते  प्रियम,
तुझ्या येण्याने माझे अंगण लख्ख उजाडले,
नव्हते हातात हात तरी कशी मी तुला कळले,
मी शोधावे म्हणते एकदा प्रियम,
नाते तुझ्या माझ्यातले

कविता आवडली.


मनोगतावर नावाचा शुद्धिचिकित्सक उपलब्ध आहे. ही उत्कृष्ट सोय आहे. लिहून झाल्यावर  वर टिचकी द्यावी आणि लेखन तपासून घ्यावे. शुद्धलेखनातल्या चुका दुरुस्त कराव्यात.

तसेच
हे लक्षात ठेवावे. हे यासाठी सांगावेसे वाटते कारण एकदा का प्रतिसाद आला की लेखकाला आपल्या लेखनात बदल/संपादन करता येत नाही. आपण लेखनाला प्रतिसाद येईपर्यंत बदल करू शकतो.  प्रतिसाद येईपर्यंत संपादन दुवा लेखकाला उपलब्ध असतो. त्या दुव्यावर टिचकी द्यावी आणि हवे ते बदल करावे.



चित्तरंजन