नव्या पाहुनी ह्या गझलेसी सुंदर
विसरलो पुन्हा मी प्रतिज्ञा स्वतःची
प्रतिज्ञा स्वतःची विसरणे स्वतःचे
करावीस केवळ तू पर्वा स्वतःची
पुरे जाहली विडंबने अनिरुद्धा
लिहावी आता तू कविता स्वतःची
किती धोतरे अन किती कासोटे हे
फेडावयाला भिती का स्वतःची
अरे लाख आयडी आहेत येथे
ओळख कुणाला पटावी स्वतःची
सन्जोप राव