स्वातीताई,
खान-पान-किस्से आवडले....
ताजमहाल,बॉलिवूड आणि भारतीय जेवण यांचे फिरंगी मंडळींना विशेष आकर्षण आहे असे जाणवले...सहमत!

अलीकडे भारतात येणाऱ्या बहुतेक सगळ्या जर्मन सहकाऱ्यांना इथलं जेवण आवडतं, ते त्यासाठी (आणि तिखट खाण्यासाठीही त्यातले काही) उत्सुक असतात, असं मी बघितलंय.

भारत म्हणजे 'हॉट वेदर' आणि 'हॉट फूड' असा मला बऱ्यांच जणांचा समज दिसला... हिमालयाव्यतिरिक्त अगदी दिल्ली/पुण्यातही (अनुक्रमे) ० आणि ६ अंशांपर्यंत तापमान असतं हे ऐकून माझ्या जर्मन सहकाऱ्यांना आश्चर्य वाटलं होतं.

वास्तविक भारतीय जेवण खूप तिखट असतं (हा तिथे सार्वत्रिक समज आहे) हे मला स्वतःला पटत नाही. ते तिखटही असू शकतं; पण कमी तिखट / गोड असंही असतं असं मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं.

अर्थात, त्यांची गोड जेवणाची कल्पना मला एकदा अनुभवायला मिळाली. एका पारंपरिक जर्मन खानावळीत मला 'साल्मन' मासा संत्र पिळून खायला देण्यात आला (लिंबाप्रमाणे). मासा इतका बेचव लागू शकतो हे मला तेव्हा कळलं. (तत्पूर्वी मी एकदा इटालियन उपाहारगृहात साल्मन खाल्ला होता आणि मला तो आवडलाही होता!)

माझ्या एका सहकाऱ्यानं मला त्याला भारतीय जेवण आवडत नाही असं मला नम्रपणे सांगितलं होतं. (मी मात्र, मला जर्मन जेवण आवडत नाही ही स्पष्टोक्ती उगाचच टाळली होती....)

- कुमार