जो कुठल्याच गटाशी स्वतःला बांधून घेत नाही व स्वत:च्या विचाराने चालतो त्याला कुठलाही गट विरोधी गटाचा समजतो. म्हणजे सर्व गट त्याला शत्रू समजत असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर स्वतंत्र विचारांचा माणूस शत्रूंनी वेढलेला असतो. तो अल्पसंख्यच नाही तर एकसंख्य (एकटा) असतो. एखाद्या गटाने त्याला विरोधी गटांत घालून त्रास द्यायचे ठरवले तर कोणीही त्याच्या बाजूने उभे राहात नाही. अगदी दुसरा स्वतंत्र विचारांचा माणूसही नाही. कारण सत्य असंघटित असते व असत्य संघटित असते.
यावर उपाय म्हणजे स्वत:च्या विचाराने जगू पाहणाराने शत्रूंच्या वेढ्यांत एकट्याने राहाण्यासाठी आवश्यक ती शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता संपादन करणे.