आपण या आधी महाबळेश्वराला गेला होता काय? गेल्यास कुठे राहिला होता?
- अहो महामंडळाच्या या ठिकाणी या अनुभवांनी कोणीच जात नसेल तर हे सगळं डबघाईला येणं साहजिक आहे. त्या नजरा देखील तितक्याच अपेक्षीत. एकूणच वर्णनावरून त्यांना वेतन मिळत असेल का? हा प्रश्न मनात आला.
- महाबळेश्वराला हॉटेल्सचा इतका सुकाळ आहे की महामंडळ अन सरकार त्यावर इतका कर कमावतं असतील की ही मालमत्ता व्यवस्थित राखण्यासाठी खर्च कशाला? हा एक विचार असेल.
- काही वर्षांनी हिच मालमत्ता विकण्यासाठीची हि एक पूर्व तयारी असेल. कदाचित अजून काही वर्षांनी जाल त्या वेळी तिथे आलिशान व्यवस्था असेल पण ते असे खासगी हॉटेल अन मालक तिथला एखादा मुरब्बी राजकारणी.
- तसे पाहता, महाबळेश्वर आता फारच सुमार वाटते. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणा पेक्षा चौपाटी वा खरेदीचा थंड हवेच्या ठिकाणचा बाजार वाटतो.
अवांतर:
चांदणी चौकापासून ४०-५० की.मी अंतरांवर सुंदर ठिकाणे आहेत. शक्य असल्यास नुकत्याच झालेल्या पुणे कट्ट्याला गेलेल्या मनोगतींनी थोडी झलक पाहिली असेल.