यावरून एक कथा आठवली महाभारतातील, थोडक्यात सांगतो- घटोत्कचचा मुलगा बर्बरीक याला पराभुत न होण्याचे वरदान आणि ऊच्च लढाईचे शिक्षण मिळालेले असते. त्याच्या गुरूला त्याने वचन दिलेले असते कि तो युध्धात नेहमी कमजोराची बाजू घेईल. महाभारताचे युध्ध सुरू होण्यापुर्वी सर्वानां पेच पडतो कि जर कौरव कमजोर झाले तर बर्बरीकला त्याचीं बाजू घ्यायला लागेल आणि पांडव कमजोर झाले तर पांडवाचीं बाजू घ्यावी लागेल. अशाने युध्धात शेवटी फ़क्त बर्बरीकच जिवतं राहू शकत होता. बाकी सर्वांचा नाश झाला असता.

आज समाजात सगळेचजण अल्पसख्यांक होतायेत. अशाने नाश तर होणार नाही. पण जे होईल ते नाशापेक्षा चांगले नक्किच नसेल.