सर्किट तुमचा (रसल्स पॅराडॉक्स?) तर्क पटला नाही म्हणून थोडा चोंबडेपणा करतो.
हा निष्कर्ष चुकीचा आहे. कारण, समजा शेवटी युद्धात बर्बरीकची लढत 'क्ष' ह्या व्यक्तीशी होते. ह्याचा अर्थ क्ष हा बर्बरीक पेक्षा बलाढ्य आहे [नाही, क्ष हा क्षच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा बलाढ्य आहे, आणि बर्बरीकनी प्रतिस्पर्ध्याची बाजू घेतली आहे कारण प्रतिस्पर्धी क्ष पेक्षा कमजोर आहे, क्ष आणि बर्बरीक यातला बलाढ्य कोण याचा निकाल लागायचा आहे.], कारण बर्बरीक हा नेहमी कमजोरांची बाजू घेतो. पण बर्बरीकने कमजोरांची बाजू घेतली तर तो कधीही पराभूत होत नाही. त्यामुळे बर्बरीक नक्कीच जिंकेल. ह्याचा अर्थ क्ष हा बर्बरीकपेक्षा कमजोर आहे. त्यामुळे क्षची बाजू बर्बरीक ने घ्यायला हवी. म्हणजे, क्ष आणि बर्बरीकचे युद्ध झाले, हे चूक आहे.
मला वाटतं की तुमचा तर्क खालील गृहितक फ़रकामुळे आहे.
मुळ गृहितक : क्ष आणि क्ष चा प्रतिस्पर्धी यातल्या कमजोराची बाजू बर्बरीक घेतो.
तुमचे गृहितक : बर्बरीक तो स्वत: व क्ष यातील कमजोराची बाजू घेतो.