मूळ चर्चाप्रस्वाताविषयी फारसे मत सांगता येत नाही. मी शुभेच्छा मराठीत लिहिण्याचा नेहमीच प्रयत्न करते. इथे अमेरिकेतही सहकाऱ्यांच्या जन्मदिनी द्यावयाच्या भेटकार्डावर हॅपी बर्थडे बरोबरच जन्मदिनानिमित्त अनंत शुभेच्छा असे लिहायला विसरत नाही. शिवाय हे काय आहे? अशी विचारणा झाल्यावर भारतीय भाषा व मराठीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते. मनोगत वा विकीपीडियासंबंधीचे वाक्य शुभेच्छांमध्ये विषयांतर न होता कसे अंतर्भूत करावे हे ठरवणे अवघड वाटले.
विषयांतराबद्दल क्षमस्व. गर्वसे कहो हम हिंदू है हे गाणे कुणाला पूर्ण माहीत आहे का? मला एक कडवे आठवते आहे ते असे -
गर्वसे कहो हम हिंदू है ॥
युगोंपूर्व संस्कृती सूर्य बन मानवताकी सुबह जगायी।
इसी सूर्य की प्रकाशकिरणोंने सबको सही राह दिखायी ।
फगवा ध्वज फहरे नभमंडल जबतक चंदा तारे ॥
ह्या पुढचे मात्र अजिबात आठवत नाही.