गर्व से कहो हम मराठी हैं!
आपले वरील वाक्यच मराठी नाही! हे म्हणजे अगदी मराठी भाषेचा शिवाजी समजल्या जाणाऱ्या १९व्या शतकातील विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारखे झाले. ते अभिमानाने म्हणायचे की "I am known as Shivaji of Marathi language"! (ह. घ्या.)
आपण संक्रांतीबद्दल लिहिले आहे ते चांगलेच आहे, पण त्याशिवाय नूतन वर्षाच्या शुभेच्छांनिमित्त मराठीची आठवण करून द्यायची असेल तर मराठी संस्कृती प्रमाणे जे नूतन वर्ष आहे, "गुढी पाडवा" त्याला पण आठवणीने तशा शुभेच्छा देणे महत्त्वाचे आहे.
बाकी संक्रांतीबद्दल मनोगती एकमेकांना "....गोड लिहा" असा सल्ला देऊ शकतील!