माझाही थोडा चोंबडेपणा..
समजा शेवटी बार्बरिक, क्ष आणि य अशा तीन व्यक्ती उरल्या. त्यातील क्ष हा य पेक्षा बलाढ्य असल्यामुळे बार्बरिकने य ची बाजू घेतली. बार्बरिक कधीच हरत नसल्याने य चा विजय झाला. त्यामुळे शेवटी बार्बरिक आणि य जिवंत राहिले.
आता बार्बरिक आणि य मध्ये कोण बलाढ्य? समजा य बार्बरिकपेक्षा बलाढ्य असेल तर बार्बरिक ला कमजोराची म्हणजे स्वतःची बाजू घ्यावी लागेल. त्यात तो जिंकल्यामुळे शेवटी बार्बरिक तेवढा उरेल, बाकी सगळे मरतील. मात्र जर बार्बरिक य पेक्षा बलाढ्य असेल तर त्यांचे युद्ध होऊ शकणार नाही, कारण बार्बरिक ने कमजोर य ची बाजू घेतल्याने दोघेही एकाच बाजूला व प्रतिस्पर्धी म्हणून कोणीच नसेल. ह्या परिस्थितीमध्ये बार्बरिक आणि य हे दोघे जिवंत राहतील.