मला वाटते गर्व शब्दाची हिंदी आणि मराठीतील अर्थछटा वेगळी आहे. त्याबद्दल दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती मार्गदर्शन करू शकेल.

चर्चा प्रस्तावाचा उद्देश्य काही जणांना कळला नसेल तर तो दोष मी माझ्याकडेच घ्यायला हवा.

मनोगत, विकिपीडिया ही संकेतस्थळे स्वतःच्या आर्थिक बळावर कमर्शीयल म्हणजे जाहिरातबाजी करण्यास सक्षम नाहीत. मार्केटिंगच्या आणि जाहीरात बनवणाऱ्यांच्या दृष्टीतून अभ्यासले तर मनोगतची प्रसिद्धी जास्त करून मौखिक  स्वरूपाची सदस्याने आपल्या परिचित व्यक्तींना सांगून होते आहे. आपण परिचयातील प्रत्येक व्यक्तीला  माहिती देण्यासारखे  नेहमीच्या बोलण्यात काही होतेच असे नाही. मग असे सांगणे खूप मर्यादित व्यक्ती पुरते मर्यादित राहते.

आपण बऱ्याचदा विविध स्वरूपाच ईमेल  एस. एम. एस इत्यादी फॉरवर्ड करतच असतो.  तर या वेळी आपल्याला आवडणाऱ्या मनोगत बद्दल कळवूया असा उद्देश्य आहे. आपण नकळत जी गोष्ट करतच असतो ती जाणीव पूर्वक करावी , ज्या मनोगताला आपलंसं मानणारी मंडळी  हे मनापासून करू  शकतील का  पाहत होतो, पण मृदुलाताईंनी म्हटल्या प्रमाणे विषयाला सोडून होणारा कोरडा   छिद्रद्वेषीपण होताना पाहून खंत वाटल्या शिवाय राहतं नाही. मीही मराठीच आहे आणि छिद्रद्वेषीपण माझ्याही हातून घडतो म्हणून मी कुणाला दोष देत नाही.

मला वस्तुतः विकिपीडियाची प्रत्यक्ष काळजी नाही विकिपीडियाचा सभासद मुख्यत्वे शोधयंत्र म्हणजे  सर्च इंजिनच माध्यमातून येतो आहे. विकिपीडियाला मनोगतावरून येणाऱ्यांची संख्या कमी महत्त्वाची नाही  पण वस्तुतः: तशी मर्यादित आहे. 

-विकिकर