इथे अमेरिकेतही सहकाऱ्यांच्या जन्मदिनी द्यावयाच्या भेटकार्डावर हॅपी बर्थडे बरोबरच जन्मदिनानिमित्त अनंत शुभेच्छा असे लिहायला विसरत नाही. शिवाय हे काय आहे? अशी विचारणा झाल्यावर भारतीय भाषा व मराठीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते.

वा स्तुत्य ! , हे तर खरंच  पुढचं पाऊल !!  सांस्कृतिक देवाणघेवाणीच छान उदाहरण.

मनोगत वा विकिपीडियासंबंधीचे वाक्य शुभेच्छांमध्ये विषयांतर न होता कसे अंतर्भूत करावे हे ठरवणे अवघड वाटले.

अवघड निश्चित आहे कारण वस्तुतः जाणीव पूर्वक   करणे ही स्वतंत्र कलाही आहे.टिव्ही आणि चित्रपटातन बेमालूम पद्धतीने होणारी  जाहीरात आपण पहातच असतो.  मनोगती मध्ये  भाषाप्रभू व्यक्तिमत्त्वे असताना अशक्य काहीच नाही.फक्त मनावर घेतले पाहिजे. लोक स्वतःला न आवडणाऱ्या गोष्टीची जाहीरात करून उपजिवीका घडवतात. इथे आपल्याला खरेच आवडणाऱ्या  संकेतस्थळा बद्दलच बोलायच आहे!

गर्वसे कहो हम  है ॥ 

संकल्पना लिहिण्याचं कारण वाक्य सहज लक्षात राहणार असावं  छोटं असावं आणि अभिमानाला बळकटी यावी याचं उदाहरण म्हणून वापरलं , शेवटी मराठी भाषांतरही दिलं पण  इतर काही (इथे आपली ही प्रतिक्रिया अभिप्रेत नाही) प्रतिक्रिया पाहून आपण कुठेतरी चुकलो हे उमगले.

 -विकिकर

(लांबलेल्या उत्तराबद्दल क्षमस्व)