मला वाटतं उर्दूत अशा धार्मिक प्रवृत्तीच्या गझलांचीही परंपरा आहे. चित्त अधिक खोलात जाऊन सांगू शकतील.

मला ह्या बाबत खोलातली माहिती नाही. जेवढी आहे तेवढी देतो. 'तसव्वुफ़' किंवा  सूफीवाद उर्दू गझलेत जागोजागी आढळतो. पण विशुद्ध सूफी गझलकार इक्कादुक्काच. ख़ाजा मीर दर्द हा त्यापैकीच. त्याच्या एका गझलेचे हे काही शेर मासलेवाईक आहेत -

है ग़लत गर गुमान में कुछ है
तुझ सिवा भी जहान में कुछ है

दिल भी तेरे ही ढंग सीखा है
आन में कुछ है, आन में कुछ है

इन दिनों कुछ अजब है हाल मेरा
देखता कुछ हूं, ध्यान में कुछ है

ग़ालिबसारख्या कवीने तसव्वुफ़ला फारसे गंभीरपणे घेतले नाही.  त्याने आपल्या एका पत्रात स्पष्टच म्हटले आहे की 'तसव्वुफ़ बराये-शेरे-गुफ़्तन ठीक है.' म्हणजे तसव्वुफ़ गझलेचा ज़ायका, स्वाद वाढवण्यापुरते ठीक आहे.