विषयात भर घातल्या बद्दल आभार.

चाणक्यांनी खरे यांना प्रश्न विचारला म्हणून बहुतेक इतर कोणी प्रतिसाद देत नसावे. (चाणक्य: ह. घ्या.) - खरे असावे कदाचित. पण जेव्हा मला माझी मते पटतात तेव्हा मी लिहितो. चूक असेल तर खंडन होईलच अन मला सुद्धा माहिती मिळेल. फक्त प्रसिद्धीसाठी मी तरी इथे लिहीत नाही. आपण पाहिलंत तर इथे काही लोक अशा विषयांवर एक शब्द सुद्धा लिहीत नाहीत. पण एरवी मात्र रकाने भरभरून लिहितील.

सर्किट राव, एक विनंती. आपले मुद्दे चांगले असतात. किंबहुना अनेकदा चुका बरोबर करण्यासाठी असतात. त्यासाठी आपल्याला दाद द्यायला हवी. पण त्यामुळे विषयांतर होऊन चर्चा भरकटत जाते. मूळ मुद्दे बाजूला राहतात. आपल्याला विनंती आहे की विषयांतर शक्यतो टाळावे. उदाहरण देऊन विषयांतर होत असेल तर चर्चा मूळ विषयावर आणण्याचा प्रयत्न करावा.

मला वाटते की आपणच जर यावर काही नाही केले तर वर एका प्रतिसादात जे लिहिले आहे त्या प्रमाणे जे काही होईल ते नाशा पेक्षा वाईट असेल. एकूणच, जात आणि धर्म यांच्या सीमा आपणच पुसट बनवल्या पाहिजेत. उपाय शोधले पाहिजेत.

भारता बाहेर वावरताना मला हा प्रश्न नेहमी पडतो की जगात कदाचित सर्वात जास्त लोक  संख्या असलेले आम्ही भारतीय नेहमीच अल्पसंख्याकाच्या मानसिकतेने जगतो. भारतात गेले तरी कोणत्यातरी गटात जाऊन त्याचा झेंडा मिरवतो. स्वतःला अल्पसंख्याक म्हणवून घ्यायला धन्य मानतो.