खुशी, मिलिन्द, प्रसिक, संजोप राव, चित्त

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

खुशी

मै हू ना च्या दुखवट्यात मी सहभागी आहे. प्रेक्षकीय संन्यास शब्द आवडला. :) शाकिराचा नवीन अल्बम अजून बघितला नाही, पण नाताळात बघायला मिळेलच.

मिलिन्दपंत

हॅलिडे-रेस्निक, खानत्रयींचा फोटू, शाकिराचा अल्बम अशा सर्व पवित्र गोष्टींची शपथ घेउन सांगतो, मीही पंतच आहे ताई नाही. :-)  (मै जो कुछ भी कहूंगा सच कहूंगा... हे त्याआधी.)  माझा एक खराखुरा आयडी संभाळता-संभाळताच नाकीनऊ येते आहे हो! :-)

प्रसिक

ह. घ्या. चा ष्टांप मारला तरी माझ्यावर शाहरुख फ्यान तोफा डागणार नाहीत अशी खात्री नव्हती, पण अजूनतरी तसे झाले आहे. :)

रावसाहेब

कमाल आणि धमाल केलीत. किंग खानबद्दल १००% सहमत. काही वेळा नायक-नायिका दोन्ही एकाच 'लेव्हल'चे असल्यावर मी फक्त मेहमूदसाठी चित्रपट बघितला आहे. पचनशक्तीचे विश्लेषण आवडले. :) यावर तुमच्या खास शैलीत काहीतरी लिहाच!

चित्त

सहमत. माझे तर हल्ली हिंदी चित्रपट बघणेच कमी झाले आहे. पण जेव्हा बघतो तेव्हा मात्र आमच्या मित्रमंडळांच्या भाषेत 'फुल्ल टीपी' चालू असतो. कर्मधर्मसंयोगाने माझी सख्खी बहीण शाहरुख फ्यान आहे. आम्ही एकत्र चित्रपट बघतो तेव्हा काय होत असेल याची कल्पना आली असेल. :-)

हॅम्लेट

अवांतर : या चर्चेवरून मनोगत काही प्रमाणात तरी 'शाहरुख'फ्री आहे असे समजायला हरकत नाही. :-)