अनुवादित साहित्याचा हेतू यातूनच सफळ होतो असे वाटले. सांस्कृतिक देवाण-घेवाणीची ही फारच चांगली सोय आपल्याला उपलब्ध आहे असे यावेळी जाणवले. ज्यांनी असे परभाषेतले साहित्य मराठीत आणले त्या सर्वांचेच ऋण मानावे तेवढे थोडेच आहे.
-- सहमत आहे. अनुवादित साहित्याबरोबरच थोड्याफार फरकाने प्रवासवर्णनेही या सांस्कृतिक आदान-प्रदानाला हातभार लावतात. मनोगतवरील सर्वसाक्षींचा पाइ-युलानवरील लेख एका थँक्सगिव्हिंग पार्टीमध्ये असाच संवाद वाढवण्यासाठी माझ्या मदतीला आला होता.