ह्या गझलेत सर्व शेरात शेवटी एक निराशा आणि विफलतेचा सूर आहे. शिवाय अकारान्त रदीफ घेतल्याने गेयतेसाठी एक शेवटचा सूर....अ...... लांबवावा लागतो त्याची सुद्धा वाचकांना कल्पना आली असेल.
शेवटच्या तीन शेरात प्रयत्न कशाला करावयाचे कारण हेतू सफल होणार नाही असा अर्थ अभिप्रेत आहे.
एक अक्षरावर आकांत कशास?
बोल, रामशास्त्र्या, देहान्त कशास?
हा शेर पेशवाईतील एका पत्राकडे आणि हत्येकडे निर्देश करतो असे वाटते. एका अक्षराने घात झाला आणि त्यामुळे हत्येच्या गुन्ह्यासाठी रामशास्त्र्यांनी देहान्ताची शिक्षा दिली. गारद्यांची चूक नव्हती तरी देहांताची शिक्षा कशाला?एका अक्षराने काय परिणाम झाला पहा, त्याकरता कशाला एवढा खटाटोप असे काहीसे असावे. रामशास्त्र्यांना कठोर जाब विचारावा लागावा असे काही त्यांच्या हातून इथे घडले असे वाटत नाही.
ही जरा तनुची, तारुण्य मनात
ही अशी अघोरी संक्रांत कशास?
इथे जरा ह्या शब्दाचा अर्थ वृद्धावस्था असा घेतला की अर्थ लावणे सोपे व्हावे.
गझलेची शीर्षक समर्पक वाटले नाही. त्याऐवजी विफलता, अपयश असे काही दर्शवणारे शीर्षक अधिक चांगले वाटेल असे वाटते.
चू.भू. द्या. घ्या.