हा लेख बरेच नवीन संदर्भ उपलब्ध करतो आहे. किमान या पौराणिक कथांमधील परस्पर विरोधी आणि उकल होण्याच्या दृष्टीने अवघड असली तरी संदर्भ दृष्ट्या  बहुमोल माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद . कदाचित विकिपीडियातील गोदावरी लेखात उद्धृत करण्यास प्रताधिकारांच्या(प्रताधिकारा बाबतीत इंडियन एक्सप्रेस समूह थोडा कन्झर्वेटीव आहे असा माझा समज आहे.) अडचणी मुळे वेळ लागेल.दिलेले पौराणिक संदर्भ  पुन्हा एकदा स्वतंत्र पणे तपासून आपण ते निश्चित उद्धृत करू.

एकूण महाराष्ट्रातील नासिक स्थान आणि गोदावरी नदी बरेचसे पुरातन आहेत. माझ्या वाचनात आल्या नुसार गोदावरीच्या विविध गाळाच्या स्तरांचे काळा नुसार वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले आहे पण ही माहिती खूपच क्लिष्ट भाषेत असल्यामुळे समजण्यास अवघड गेली होती पण ते संदर्भ दुवे मी गोदावरी लेखात समाविष्ट केलेले आहेत.

यात एका गोष्टी बद्दल मला जो प्रश्न पडत आला आहे तो हा की महाराष्ट्रातील गोदेचे खोरे खरेच पुरातन असेल तर,सिंधू खोऱ्याच्या तुलनेत गोदावरी खोऱ्यातील प्राचीन संस्कृतीचे उत्खनन होऊन मिळालेले पुरातत्त्व अवशेष तौलनिक दृष्ट्या मर्यादित वाटतात. असा फरक का पडत असावा ?

-विकिकर