पदवी मिळवल्यानंतर पहिली नोकरी मिळवण्याची खटपट, उत्सुकता, हळहळ, घरच्यांच्या अपेक्षा, पाठींबा , सर्वांचे उपदेश , त्यातील अपेक्षाभंग यांचे यथार्थ चित्रण केले आहे. उमेदवारीच्या काळातले अनुभव हृदयस्पर्शी आहेत.

शैली खुसखुशीत असली तरी त्यामागे दडलेला उपहास वाखाणण्याजोगा आहे. आपले सर्व लेखन मनाला भिडणारे आहे. त्यातील भाषा ओघवती आहे. 
बोटभर जाहीरात आणि उमेदवारांच्या मोठ्या रांगा, वशिलेबाजी व वाढती स्पर्धा या समस्या अधिकाधिक वाढत आहेत. आपल्याला असणारा सामाजिक जाणिवांचा आरसा आपल्या ह्या सर्व अनुभवकथनातून वाचकांपुढे स्वच्छ चमकतो.

संगणक क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात ह्या 'नोकरी हवी' समस्येचे स्वरूप भयंकर भीषण आहे हे सांगावेसे वाटते. आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणारी पण सध्या भरात असणारी साद केंद्रे हा एक तात्पुरता तोडगा आहे.