एकी- एकता
समृद्धी- समृद्धता
समीप-समीपता

समृद्ध,- धी- हे विशेषण आहे. (समृद्धी हा शब्द नाम म्हणूनही वाक्यात येतो)

शाळेत फार पूर्वी 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत 'अशी प्रार्थना आम्ही म्हणत असू. त्यात भारत देश समृद्धतेने नटला आहे असे वाक्य होते.
समृद्धता ह्या शब्दाच्या उगमाविषयी-
मराठीत काही तद्धिते आहेत.
गुरुता, समता, कविता, नवीनता ही त्याची उदाहरणे. एकता, समीपता आणि समृद्धता ही आणखी अशीच उदाहरणे आहेत.

जावडेकरांच्या वाक्यात समृद्धी आणि समृद्धता दोन्ही योग्य आहेत असे आम्हाला वाटते.