संकेतस्थळ यूनिकोडमध्ये असण्याचा एक मुख्य फायदा म्हणजे त्या स्थळावरचा मजकूर गूगल इ. वेबशोध साधनांद्वारे तपासू जाऊ शकणे हा. उदाहरणार्थ, मला मनोगत कसे सापडले हेच बघा ना.. मला श्वास चित्रपटाविषयी माहिती पाहिजे होती म्हणून मी असंच मजा म्हणून गूगलवर जाऊन "श्वास" हा शब्द टाईप केला आणि मनोगतावरच्या श्वासबद्दलचे चर्चासदर गूगलच्या शोध निकालांपैकी एक होते. अर्थात मी लगेच मनोगताचा सदस्य झालो :-).

हे बघा अजून एक उदाहरण म्हणून "राम" हा शब्द गूगलवर शोधल्यास हे असे निकाल येतात. जर सर्व मराठी संकेतस्थळे (वर्तमानपत्र वगेरे) यूनिकोड वापरू लागली, तर विचार करा की आपण सामान्य शोध साधनांद्वारे आपल्याला हवा तो मजकूर शोधू शकू!