निनाद,
इथे या विषयावर बऱ्याचदा चर्चा झाली आहे. समर्थक - आणि विरूद्ध यांची चांगली जुंपते :) आणि ८५ (८८?) प्रतिसाद झाले की प्रशासक येतात...
चर्चेचे फ़ळ ... शून्य!
कारण बऱ्याचदा समर्थक (किंवा ज्योतिष हे शास्त्र आहे आणि त्यात तथ्य असू शकते असे माणणारे) हे स्वतःला आलेले अनुभव सांगून त्यात तथ्य आहे हे सांगण्याचा यत्न करत असतात.
तर विरूद्ध पार्टी फ़क्त हे विज्ञाना मुळे झाले किंवा तुमच्या बाबतीत झाले मग दुसऱ्यासाठी का नाही ... वगैरे सारखे फ़ाटे फ़ोडुन तुमच्या सांगण्याची (अनुभवाची) एकतर खिल्ली उडवतात किंवा ते खोटेच आहे असे म्हणत बसतात.
ना विचारांची देवाण घेवाण ना निष्पत्ती
तेव्हा या प्रकारच्या चर्चेत काही गंमत नाही. (हे कदाचित तुम्हाला काही दिवसांनंतर पटेल :))
दुसरा भाग हा की या विषयासाठी वेगळा भाग का नको?... तर इथे असे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे भाग करणे न करणे हे प्रशासकांवर अवलंबून आहे. त्यांना सांगुन बघा (उपयोग होणार नाही, कारण इथे लोकं मराठी गाणी , पुस्तके लिहितात. त्याविषयी असे विभाग करावेत अशी विनंती केली होती बऱ्याच जणांनी, पण त्यावर प्रशासकांचे काहीच उत्तर नाही. किमान मला तरी तसे माहित नाही. दुसरे असे की कदाचित ते या गोष्टींचा विचारही करत असतील. पण अजुन या गोष्टी गुलदस्त्यात आहेत असे मानू :) )
हे विषय: भार्गवराम ने एक दुवा दिला आहेच. 'ह्यावरून आठवलं" मध्ये बघा काही समांतर चर्चा मिळण्याची शक्यता आहे.
--सचिन