इतक्या वेळा 'आनंद' बघूनही काही माणसं अशी मृत्यूच्या सावलीनं काळवंडलेली आयुष्यं जगत असतात. आयुष्याचा उतार लागलेली काही माणसं तर मरणाच्या कल्पनेने केंव्हाच मरून गेलेली असतात.
काहीसं असंच दिसतं बुवा.
रावसाहेब,
'बायोलॉजीकल डेथ इज रियल डेथ' असे मानणाऱ्या (हा माझा आपल्याबद्दलचा अंदाज मोकळेपणाने मांडला. आपण या मताशी सहमत नसाल तर आत्ताच क्षमा मागतो) विज्ञाननिष्ठ माणसाचे मरणाबद्दलचे विचार सुंदरच आहेत. पंचेद्रीयांनी घेता येईल तितके, अभिजात आणि सूक्ष्म असे (क्वालिटी) सुख, मरणाच्या क्षणापर्यंत घेता यावे आणि यातच आपला अंत व्हावा असे काहीसे वरिल प्रतिपादन वाटले. अपरिहार्य अशा मरणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणारे आपले विचार आवडले. आपली मांडणी आणि लेखन छानच. तेगार हा शब्द फार आवडला.
आवांतर-मरणपश्चात जीवन असते असे मानणाऱ्या माणसाचे विचार काही वेगळे ही असु शकतात.
--लिखाळ.