मला तर वाटतंय की भारतातले लोक तिखट खातात हा समज इथल्याच उपहारगृहांनी रूढ केला आहे. इथे तर जेवणा आधी ते लोणचे आणि पापड (पापड्ड्म) देतात, मग मुख्य जेवण येतं. असं भारतात कोण कुठे करतं !! तसंच आपण जेवणात गोड घेतो. ही स्वीट-डिश कल्पना कोणी रूढ केली काय माहीत.