परवा आमच्या चिरंजीवांच्या शाळेत जाण्याचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाचा त्याच्या वर्ग शिक्षिकेकडून अहवाल घेण्याच योग आला. तेव्हा ते शाळेचे वर्ग बघून काही काळा पुरता मी थोडा हळहळलो.. आठवणीच्या साम्राज्यातून मन लवकर बाहेर पडेना..तात्या म्हणाले तसं खूप काही आपल्या हातून हरवलं आहे हीच जाणीव पुन्हा पुन्हा झाली.
आज पुन्हा तुमचा सहज सुंदर लेख वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याबद्दल मनापासून आभार.

(बालपण हरवलेला) अनिरुद्ध..