स्वाती,
तुमची शंका बरोबर आहे. अगदी काटेकोरपणे बोलायचे झाले तर रेषाखंडच म्हणायला हवे. पण अनंत रेषेबद्दल बोलण्याचा प्रसंग (situation)फारच कमी वेळा येतो, म्हणून रेषाखंडासाठी रेषा हा शब्द सरसकट वापरला जातो. खेरीज आपण रेषाखंडाच्या दोन्ही टोकांचा नावे देऊन उल्लेख केल्यावर तिला रेषा म्हटले तरी तो रेषाखंड आहे हे कळते. (हे 'तांबडा पितांबर' म्हटल्यासारखे आहे हे खरे, पण तरीही!)
रेषेची लांबी आणि त्यातील बिंदूंची संख्या यांचा संबंध नाही. कारण आपण बिंदू मोजून लांबी ठरवत नाही. त्यासाठी वेगळी एकके(units) आहेत. रेषेवरील बिंदूंच्या बाबतीत दोन शेजारशेजारचे बिंदू असे काही असतच नाही. कारण कोणत्याही दोन बिंदूंच्या दरम्यान अनंत बिंदू असतात. ह्याला गणिताच्या भाषेत The points on a line segment are "everywhere dense." असे म्हणतात.