बोरकरांच्या मी विझल्यावर, संधिप्रकाशात अशा या विषयावर सुंदर कविता आहेत. त्यातील संधिप्रकाशात इथे देतोय. कवितेचे खरे नाव माहित नाही. 'आयुष्यावर बोलु काही' च्या एका प्रयोगात ही ऐकली होती.
संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असाविस पास, जसा स्वप्न भास
जीवि कासाविस झाल्यावीण
तेव्हा सखे आण, तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण त्याची नाही
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे
रंभगर्भी वीज सुवर्णाची कांडी
तशी तुझी मांडी देई मज..
वाळल्या ओठास दे निरोपाचे फुल
भुलीतली भूल शेवटली
जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे
सर्व संतर्पणे त्यात आली.
टीप: ही कविता internet वरून घेतल्यामुळे त्यात चुकीचे शब्द असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व.
संजोप, लेख सुंदरच.
- ओंकार.