फॉलोअपसाठी पाठपुरावा असा शब्द घेता येईल.
कोटेशनसाठी दरप्रस्ताव हा छाया यांनी सुचवलेला शब्द अधिक योग्य वाटतो. निविदा हा शब्द टेंडरसाठीच आहे.
कॉन्फरन्स हॉलसाठी चर्चादालन हा शब्द सुचविलेला आहेच. सभागृह हाही शब्द सामान्यपणे वापरला जातोच.
अपसेट यासाठी अस्थिर, चिंतीत असा शब्द घेता येइल.
अर्जंट यासाठी तातडीने आणि लगेच असा शब्द देता येऊ शकतो.