गाडगे बाबा यांना क्रातिकारी संत म्हणून समजले पाहिजे. असे लोकोत्तर आयुष्य कधीतरीच जन्माला येते हेही खरे.

गाडगेबाबा संबंधी एक विलक्षण हकीकत. नाशिक जवळ देवळाली कॅम्प नावाचे एक शहर आहे. तेथील एका कापडाच्या दुकानाचे उद्घाटन गाडगेबाबांच्या हस्ते झाले आहे. ही गोष्ट त्यांच्या लोकसंग्रहाची साक्ष देण्यासाठी पुरेसी आहे. ( तशीच एक आठवण म्हणजे साने गुरुजी यांच्या हस्ते मुंबईमधील एका उडप्याच्या हॉटेल चे उद्घाटन झाले होते.)

निरक्षर, गरीब पार्श्वभूमी असुनही त्यांनी उभ्या केलेल्या धर्मशाळा आणि त्यातुन वेगळे राहण्याची गोष्ट बघितली म्हणजे मन थक्क होते.