नू.म.वि. या पुण्याच्या आणखी एका सुप्रसिद्ध शिक्षणसंस्थेचे दर्शन घडवले. तिथल्या एका चुणचुणीत मुलाने हातांच्या इशाऱ्याने शेवटचे सव्यापसव्य दाखवले ते मात्र सर्वांना नीट समजले
खूप पूर्वीची आठवण झाली. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रेणुकास्वरूप मेमोरिअल शाळेत (तेव्हा मुलींचे भावेस्कूल) असे. तो पत्ता बाजीराव रस्त्यापासून बिनचूक सांगणे फार अवघड असे!
या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे म्हणावे लागेल.
खरेच आहे. एका वर्षी अवेळी मुसळधार पावसाने मांडवात पाणी शिरले तेव्हा आयत्यावेळी युक्ती सुचून मंगलकार्यालयांतून पाट आणून रसिक श्रोत्यांची बसायची व्यवस्था केली होती असे ऐकले आहे.