खरोखर अश्रद्ध/नास्तिकांनीसुद्धा मान डोलवावी असे गाडगे बाबांचे व्यक्तिमत्व व कार्य आहे. त्यांचे गो. नी. दांडेकरांनी लिहिलेले सुंदर चरित्र अवश्य वाचावे.

मला आवडलेल्या त्यांच्या काही गोष्टी -
१. आयुष्यात कधी कष्ट केल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही व तिच्यावर हक्क मानला नाही. स्वत:साठी कोणाला कधी काही मागितले नाही.
२. लोकहितासाठी जमवलेल्या अमाप पैशाचा उपभोग आपल्या कुटुंबीयांना घेऊ दिला नाही. त्यांना हाल अपेष्टात व आपल्यापासून दूर राहू दिले पण आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ दिला नाही.
३. शिष्य व्हायला आलेल्यांना आधी हातात झाडू देऊन झडझडून काम करायला लावले.
४. स्वत: लिहून ठेवले की "माझे कोणी शिष्य नाहीत. शिष्य किंवा कुटुंबीय यापैकी कोणाचाही धर्मशाळा वगैरे मालमत्तेवर हक्क नाही." भविष्यात होऊ शकणारा भ्रष्टाचार मुळातूनच खुडून टाकला.
५. अनेक कीर्तने करून समाजशिक्षण केले तरी कीर्तनानंतर लोकांचे नमस्कार घ्यायला थांबले नाहीत. नमस्कार करायला येणाऱ्यांना सोटा मारून परतवून लावले.
६. चमत्कार करून लोक जमवले नाहीत, लोकांना आपल्या नादी लावले नाही.

हो, कदाचित अध्यात्माविषयी फारसे मार्गदर्शन केले नसेल. तेवढी उणीव पूर्वीच्या संतांच्या तुलनेत राहिली खरी.