फार फार छान आणि प्रामाणिक लिहिले आहेस, अगदी करू तेवढे कौतुक कमी आहे. आज मी पण असाच लढत आहे, मना सारखी ईन्फॉरमेशन सिक्युरीटी मधे नोकरी मिळवण्यासाठी.
आजच एका मोठ्या कंपनीत गेलो होतो. सोमवारी तिथे मुलाखत झाली होती (फार छान झाली होती), तब्बल २ तास चालली होती पण मजा आली. आज पण जुजबी मुलाखात झाली पण तो मॅनेजर माझ्याशी अगदी गप्पाच मारत होता, थोड्या वेळाने त्याने माझे अभिनंदन केले व सांगितले की ही नोकरी मला मिळाली आहे. त्या नंतर त्याने मला त्याच्या प्रमुखा कडे नेले व ओळख करून दिली, त्यांनी पण माझे अभिनंदन केले व येत्या सोमवारी रुजू होण्यास सांगितले. त्या नंतर त्यांनी HR मधून एकाला बोलावले व मी येत्या सोमवारी रुजू होणार आहे ह्या बद्दल सांगून इतर बाबी पुर्ण करण्यास सांगितले. त्या माणसाने नेहमीच्या HR थाटात मुलाखत घेऊन मला बाहेर बसण्यास सांगितले.
थोड्या वेळाने मला कळविले की ते मला १० दिवसांनी बोलावतील. इतकी तफावत? माझा खरेच फार हिरमोड झाला आहे, कारण ती नोकरी अगदी मला पाहिजे तशी होती आणि मुलाखात घेणारी व्यक्ती माझी प्रमुख असणार होती, ज्या बरोबर काम करायला मला फार आनंद झाला असता.
आता तुझा लेख वाचून मी परत तलवार उचलली आहे, परत एकदा धन्यवाद.