आनंदघन,
आपण अतिशय सुंदर आणि खुसखुशीत वर्णन केले आहे. प्रत्येक परिच्छेद अतिशय मनोरंजक आणि सुटसुटीत आहे. मला हा लेख फारच आवडला.

शेवट तर झकासच. अहो मी सुद्धा सवाईला चार दोन वेळा गेलो आहे. आपण म्हणता तसेच मोगऱ्याचा सुगंध.....

ते सतरंजी राखणे वगैरे तर मजाच. अहो लोक उत्तररात्री चक्क झोपून जात. आणि त्यांचा घोरण्याचा आवजाचा इतरांना त्रास व्हायला लागल्यावर त्यांना ढुश्या मारून उठवणे, टोमणे मारणे, ... ही पण मजा असे.

--लिखाळ.