जावडेकरांच्या वाक्यात समृद्धी आणि समृद्धता दोन्ही योग्य आहेत असे आम्हाला वाटते.
खुलाशाबद्दल धन्यवाद जीवन जिज्ञासा. इतर काही तज्ज्ञांशी चर्चा करता जावडेकरांच्या वाक्यात समृद्धता योग्य आहे हे समजले आहे.
अवांतर - प्रतिज्ञेमध्ये "... समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा..." असा उल्लेख आहे. प्रतिज्ञेत समृद्धता हा शब्द नाही. मात्र वैविध्याऐवजी विविधता हा शब्द आहे. त्याबद्दल व्याकरणविषयक अधिक माहिती/खुलासा तुम्ही कराल का?
वैविध्य आणि विविधता, ऐक्य आणि एकता, काव्य आणि कविता, साम्य आणि समता वगैरे मधील व्याकरणदृष्या असलेला फरक, तसेच भाषिक फरक ह्याविषयी तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा ही विनंती.