मनोगताच्या सागरात रे
आपण सारे मासे
साहित्याचे कण वेचता
मन आनंदाने नाचे

मास्यांनाही नावे असती
कोण कोणता कुठला
गळाला लागता मासा
ना कळे कोण गेला

छोटा मासा गडप होई
मोठ्याच्या का पोटी
नको रे बाबा असे जीणे
मासोळीला वाटे भीती