मीराताई,

लेख आवडला. सहज़ सोप्या भाषेत समज़ावून दिला आहेत. वास्तविक गणितासारखा विषय असा समज़ावून देणे सोपे नाही. पण या लेखनप्रकारात तुमचे मनोगतावरील मौलिक योगदान निर्विवाद आहे.

आमच्यासारख्यांकडून शास्त्रीय लेखनाबाबतच्या अशा उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी काही मदत (ज़से थोडे संशोधन किंवा संदर्भ छाननी इ.) लागल्यास नि:संकोच सांगणे. खारीचा वाटा उचलायला सदैव तयार आहोत.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

अवांतर: सुचवणी - कॉम्प्लेक्स नंबर्स नि ट्रिग्नॉमेट्री वर मनोगतींसाठी लेखन कराल का? गणितातील हे दोन उपविषय माझ्या खास आवडीचे असल्याने मला त्याबद्दल मनोगतावर लेखन झालेले पहायला, वाचायला आवडेल :-)