प्रत्येकाला जिव्हाळ्याचा असा लेखाचा विषय आहे. लेख ठीक. पण त्यातील शेवटचा परिच्छेद नाटकी वाटला. कृत्रिमता सुद्धा जाणवली. मरणाचे भय का वाटते त्याचे साधे सोपे उत्तर आयुष्याचा, भौतिक सुखांचा उपभोग घेण्याची सवय झालेल्या माणसाला चुटकीसरशी सगळे सोडून जाणे शक्य होत नाही हे असावे.
'सुंदर अशा आयुष्याचा अंत करणारे मरण सुंदर असावे' ह्या आपल्या विचारात आम्हाला तार्किकतेचा अभाव वाटला.
सुंदर असे आयुष्य जर मृत्यूने संपते तर तो शेवट करणारा मृत्यू सुंदर कसा असेल? असे आपल्याला वाटले नाही का?
मरणाला सुंदर करणाऱ्या/ त्या अर्थाच्या प्रश्नांची (परिच्छेद तीन) उत्तरे आपण समाधानकरित्या नंतर दिली नाहीत. परिच्छेद ३ व शेवटचा परिच्छेद यात अंतर राहिले आहे असे वाटले. शेवटच्या परिच्छेदात आपण केवळ आपल्याला येणारा मृत्यू केव्हा यावा याचे वर्णन करून म्हणून तो सुंदर आहे असे प्रगटन केले आहे. (निदाम आम्ही तरी असा अर्थ घेतला)
एवढ्या व्यापक आणि गहन विषयाकडे बघण्याचा हा आपला दृष्टीकोन आम्हाला अतिशय संकुचित वाटला.