त्रिशंकूला चोरट्यासारखं वाटण्याचं कारण असं, की तो त्याच्याखालचे लोक, आणि त्याचा वरिष्ठ यांच्यामधला दुवा बनू शकला असता, नव्हे तसं त्याच्याकडून अपेक्षितच होतं. त्याच्या अलिप्तपणामुळे ते घडलं नाही. बहुतेकदा सहकाऱ्यांबरोबर जेवायला गेल्यावर एकमेकांच्या चालीरीतींची, आहारपद्धतींची चर्चा होतेच. त्रि. ने असले विषयही नेहमी टाळले असावेत असं वाटतं, नाहीतर त्याला सुपातले पोर्कचे तुकडे हळूच खड्यांसारखे बाजूला करायला लागले नसते.

माझ्या मते, आख्खं अमेरिकन होणं जवळ जवळ अशक्य आहे, आणि तसं व्हायची जरूरीदेखील नाही. आपला त्रिशंकू तर काही वर्षांपूर्वीच स्थलांतरित झाला आहे, पण अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या भारतीय वंशाच्या मुलामुलींनाही तसं करायची गरज वाटत नाही, किंबहुना बरीचशी मुलं आपलं भारतीयत्व अभिमानाने मिरवतात. सुनिता विल्यम्सचा (येथे वादग्रस्त) अंतराळ प्रवास हे एक ताजं उदाहरण.

ज्यांना काही न्यूनगंडामुळे अथवा भ्रामक समजुतींमुळे आपल्या भारतीयत्वाची लाज वाटते, त्यांची अवस्था मात्र त्रिशंकू सारखी होते. अर्थात त्यातून बाहेर पडणं अजिबात अवघड नाही. बाहेर पडायची इच्छा असली, तर वर सर्केश्वरांनी सुचवलेले उपाय सहज लागू पडतील.