१) ऑर्कुट हे नाव कसे पडले

-- गूगलमध्ये काम करणाऱ्या ओर्कुट नावाच्या तुर्की अभियंत्याने हे संकेतस्थळ तयार केल्याने. अधिक माहिती येथे आहे.

२) सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे नेमके काय? त्या कधी सुरू झाल्या? त्यात काही भारतीय खासियत असलेल्या अशा साईट्स आहेत का?

-- कल्पना नाही.

३) ऑर्कुटवर सरसकट बंदी घालणे भारतात शक्य आहे का? त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का? अशी बंदी घालणे योग्य आहे का?

-- शक्य असावे, पण योग्य नव्हे.

४) सायबर पोलिसिंग ही नवी संस्कृतिरक्षकांची भूमिका योग्य आहे का?

-- नाही.

५) जगात कुठे ऑर्कुटवर सरसकट बंदी आहे का?

-- माहीत नाही.

६) ऑर्कुटवर शिवाजी महाराज आणि अलीकडे ब्राह्मण स्त्रियांविषयी अश्लील लिखाण याशिवाय काही अजून वादग्रस्त यापूर्वी होते का? किंवा अजून आहे का?

-- भारतद्वेषाचे काही गट अस्तित्वात होते, आहेत.

७) ऑर्कुटवरील वादग्रस्त वेबपेजेस काढून टाकण्याची पद्धत काय?

-- Report it as bogus या दुव्यावर टिचकी मारणे.

८) यापूर्वीही ब्लॉग वर बंधने भारतात आणली गेली होती का?

-- होय. अलीकडेच मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर Blogspot वरील ब्लॉग्ज भारतातून काही दिवस पाहता येत नव्हते, असे वाचनात आले होते.